Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar Crime News : तो प्रेमात आंधळा झाला, आणि नको ते केलं...

Ahmednagar Crime News : तो प्रेमात आंधळा झाला, आणि नको ते केलं पण तीच आयुष्य संपल ! पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न स्वप्नच उरलं…

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

यामुळे राक्षसवाडीसहित संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी मोहन पाटोळे या बारावीच्या विद्यार्थिनीचा राक्षस वाडी येथील प्रतीक लक्ष्मण काळे या युवकाने खून केला आहे.

यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे हा खून एकतर्फी प्रेमातून झाला आहे. प्रतीक हा श्रावणीवर एकतर्फी प्रेम करत होता,

मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रावणीला मात्र आपले ध्येय गाठायचे होते. त्या दृष्टीने ती कठोर मेहनतही घेत होती. मात्र श्रावणीची निर्दयी हत्या झाली असल्याने तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले आहे.

खरे तर श्रावणी ही पुण्यातील हडपसर येथील भेकराईनगर येथे आपल्या आई-वडिलांकडे राहते. मात्र श्रावणीचे मामा हे राक्षसवाडीला राहतात. म्हणजे तिचे आईचे माहेर हे राक्षसवाडीचे आहे. यामुळे श्रावणी आपल्या आजी, आजोबांना आणि मामांना भेटण्यासाठी नेहमीच राक्षसवाडीला येत असे.

दरम्यान श्रावणीचा खून करणारा प्रतीक हा त्यांचा नातेवाईकचं आहे. त्याचे श्रावणीवर एकतर्फी प्रेम जडले होते. त्यामुळे प्रतीक वारंवार श्रावणीला भेटण्यासाठी पुण्याला जात असे. सातत्याने प्रतीक पुण्याला येत असल्याने श्रावणीच्या आई-वडिलांना प्रतीक बाबत शंका झाली. यानंतर त्यांनी प्रतीकला पुण्यात येऊ नकोस म्हणून सांगितले आणि आमच्या घरी येऊ नकोस असे बजावले.

दुसरीकडे त्यांनी श्रावणीलाही त्याच्याशी बोलू नको असे म्हणत तंबी दिली. श्रावणीला पोलीस अधिकारी व्हायचे होते त्यामुळे ती तिच्या ध्येयाकडे कठोर मेहनत घेऊन आगे कूच करत होती. यामुळे तीने प्रतीककडे कधीच प्रेमाच्या भावनेतून पाहिले नाही.

दरम्यान पुण्यात येऊ नकोस म्हणून तंबी मिळाल्याने आणि श्रावणीही प्रतिसाद देत नसल्याने प्रतीकच्या डोक्यात वेगळंच खुळ घुसलं. आपल्या मामाच्या गावी आजी, आजोबांना आणि मामाला भेटण्यासाठी आलेल्या श्रावणीची त्याने घरात कोणी नसतांना धारदार चाकूने हत्या केली.

विशेष म्हणजे त्याने स्वतःवरही चाकूने वार केलेत. या हल्ल्यात श्रावणी जागेवरच गतप्राण झाली. हा हल्ला केल्यानंतर प्रतीकने मला जे करायचे होते ते मी केले, मी तिला मारले आणि स्वतःलाही मारून घेतले असे म्हटले आहे.

खुनी प्रतीकवर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून त्यावर उपचार सूरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर राक्षसवाडी बुद्रुक व आजूबाजूच्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments