लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केले पण सहा महिन्यांनंतर झाली एक चूक आणि गेला थेट जेलमध्ये…
त्यास अटक करण्यात कोतवाली पोलिसांना बुधवारी (दि. २७) यश आले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणारा आरोपी सहा महिन्यानंतर त्याच्या नगरमधील पाहुण्यांच्या घरी आला होता.
त्यास अटक करण्यात कोतवाली पोलिसांना बुधवारी (दि. २७) यश आले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
राजू उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख (रा. सर्जेपुरा, नगर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने आपण दोघे लग्न करू, असे आमिष दाखवून २०१९ ते २०२३ या काळात महिलेवर वेळोवेळी अत्याचार केले. महिलेने लग्नाचा विषय काढताच तिला आरोपीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात गाठले. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गत मार्च महिन्यात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तेंव्हापासून आरोपी फरार होता. तो नगरमधील पाहुण्यांच्या घरी येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी नालेगाव येथील त्याच्या पाहुण्याच्या घराभोवती सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकला. त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
- अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
- अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
- तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा