अहमदनगर

शाळकरी मुलीला तो म्हणाला…मी तुला 500 रुपये देतो, तू माझ्या बरोबर चल…

राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दि. 27 एप्रिल रोजी एक विनयभंगाची घटना घडली आहे. मी तुला 500 रुपये देतो, तू माझ्या बरोबर चल. असे म्हणून शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला.

या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुंजाळे परिसरातील भाऊसाहेब नवले यांच्या वस्तीजवळ आरोपी अरूण सरोदे हा त्याच्या दुचाकीवर आला. तो त्या अल्पवयीन मुलीला म्हणाला, मी तुला 500 रुपये देतो. तू माझ्याबरोबर चल. असे म्हणून त्याने त्या मुलीचा वाईट हेतूने हात धरला.

नंतर तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेतील फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपी अरूण सरोदे याला पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुरी पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी अरूण रावसाहेब सरोदे रा. गुंजाळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button