अहमदनगर

‘तो’ दुकानाचे शटर उचकाटून चोरी करायला लागला आणि…

रात्री साडेबारा वाजता पोखर्डी (ता. नगर) शिवारातील एकतानगरमधील साई आनंद मंगलकार्यालयाच्या मागे दुकानाचे शटर उचकाटून चोरी करताना एकाला स्थानिक नागरिकांनी पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

संदेश काशिनाथ देठे (वय 21 रा. पोखर्डी ता. नगर) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जितेंद्र बाळू देठे (वय 22 रा. पोखर्डी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदेश देठे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र देठे यांचे साई आनंद मंगलकार्यालयाच्या मागे दुकान आहे. संदेश देठे याने रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बंद असलेल्या दुकानाचे शटर उचकाटून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

आवाजाने स्थानिक नागरिकांना जाग आली. त्यांनी संदेशला पकडून पोलिसांचा ताब्यात दिले आहे. अधिक तपास पोलीस नाईक दीपक गांगर्डे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button