अहमदनगर

‘ तो’ एक सेल्फी दोन तरुणांना थेट मृत्युच्या दारातच घेऊन गेला ..!

सध्या अनेकजण नको त्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा अट्टहास करतात. या दरम्यान अनेकदा दुर्घटना घडल्या असून, काहींचे यात बळी देखील गेले आहेत.

मात्र तरीदेखील सेल्फी घेण्याची क्रेझ काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकतीच मळ्यात फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यावर सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून शेत तळ्यात पडल्यामुळे बुडुन मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा येथे घडली आहे.

राजस्थानी फर्निचर कारागीर असलेले सुरेंद्रकुमार हारडू (वय १८ ) व लक्ष्मण ओमनाथ (वय १७) हे दोन तरूण रविवारी अमावास्या असल्यामुळे सुट्टीवर होते.

त्यामुळे ते येथील आनंदकर मळ्यात फिरायला गेले. तेथील शेत तळ्यात मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह झाला.

त्यांच्याबरोबर अजून दोघेजण होते त्यातील सुरेंद्रकुमार व लक्ष्मण हे दोघे सेल्फी काढत असताना एकाचा तोल जाऊन तळ्यात पडला.

त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने तळ्यात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघे बुडू लागल्याने वर उभ्या असणाऱ्या तरुणांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले. परंतु तोपर्यत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button