अहमदनगर

‘तो’ इलेक्ट्रीक मोटारी चोरायचा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मदडगाव (ता. नगर) येथील शेतकर्‍याच्या शेतामधून एक इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरीस गेले होती. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 11 मे रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संशयीत असलेल्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

अविनाश महादेव गायवळ (वय 35) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्याकडून तोडलेल्या अवस्थेतील मोटारी, त्यामधील तांबे असा 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस अंमलदार पालवे, सोनवणे, खिळे, टकले, घावटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button