अहमदनगर

चोरीचा माल विकायला गेला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला

कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दिवसा घरफोडी करणार्‍या टोळीच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. अविनाश दिलीप क्षेत्रे (रा. भुषणनगर, केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख 42 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 20 मे रोजी पहाटे पुजा मनोज बडे (रा. भूषणनगर, केडगाव) या कुटुंबासह देव दर्शनासाठी गेल्या असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख तीन हजार 100 रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त माहिती समजली कि वरील गुन्ह्यातील आरोपी पुणे येथे आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पुणे येथे तर दुसरे पथक पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान, आरोपी क्षेत्रे शहरातील गंजबाजार परिसरात चोरलेला सोने-चांदीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन आला.

दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा कोतवाली पोलिसांचे पथक शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button