आरोग्य

Health Insurance Claim : सावधान ! या चुका तुम्ही कराल तर आरोग्य विम्याचा होणार नाही फायदा, ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी कधीच विसरू नका

तुमचा आरोग्य विमा असणे खूप फायद्याचे आहे. जर भविष्यात तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले तर या वेळी आरोग्य विमा तुमची आर्थिक बाजू सांभाळत असतो.

Health Insurance Claim : सध्याच्या युगात महागाई वाढत चालली आहे. आता कोणतेही काम तुम्ही कमी पैशामध्ये करू शकत नाही. अशा वेळी लोकांचा सर्वात जास्त खर्च हा दवाखान्यात होत असतो.

यासाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. मत जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आजच्या काळात, आरोग्य विमा खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे व यामध्ये काही प्रमाणात फसवणूक देखील वाढली आहे.

पण अनेक वेळा तुम्ही यामध्ये चूक करता आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात समस्या येऊ शकतात. यामुळे पॉलिसी खरेदी केल्यानंतर, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जेणेकरून दाव्याच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आज आम्ही अशा पाच कारणांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

क्‍लेम प्रोसेस

तुम्ही आणि आरोग्य विमा कंपनी करारानुसार बांधील आहात. त्यामुळे, क्‍लेम प्रोसेस करताना तुम्ही विहित नियमांचे पालन केले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने भरलेला अर्ज, कागदपत्रांच्या अभावामुळे तुमचा क्‍लेम नाकारला जाऊ शकतो.

आधीच अस्तित्वात असलेले रोग

आरोग्य विमा कंपनीचा हा नियम तुम्ही समजून घेणे अवश्य आहे, ज्यामध्ये पॉलिसी विकताना आरोग्य विमा कंपन्या आधीपासून अस्तित्वात असलेला कोणताही आजार कव्हर करत नाहीत. जर तुम्ही या आजारांमुळे आजारी पडलात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असेल, तर तुमची आरोग्य विमा कंपनी तुमच्या उपचाराचा खर्च उचलू शकणार नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही दावा केल्यास, तो फेटाळला जाण्याची दाट शक्यता असते.

पॉलिसी पीर‍ियड

आरोग्य विमा पॉलिसींची मुदत साधारणपणे एक वर्ष असते. पॉलिसी एका वर्षाच्या शेवटी संपेल. अशा परिस्थितीत तुम्ही पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. हे नूतनीकरणावर इतर फायदे देखील तुम्हाला मिळवून देईल.

वेट‍िंग पीर‍ियड

आरोग्य विम्याच्या बाबतीत, प्रतीक्षा कालावधीचा अर्थ असा आहे की विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला विशिष्ट कालावधीची प्रतीक्षा करावी लागेल. काही विमाधारक काही वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर आधीपासून अस्तित्वात असलेले आजार कव्हर करतात. हा कालावधी विमा कंपन्यांच्या अटी व शर्तींवर अवलंबून असतो.

काही महत्वाची प्रकरणे

प्रत्येक पॉलिसीमध्ये काही अटी असतात ज्या अंतर्गत तुमच्या आजारासाठी आर्थिक संरक्षण दिले जाते. परंतु काही अटींनुसार तुम्ही दावा करू शकत नाही. अशी कोणतीही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. तसेच तुम्हाला काही शंका असल्यास किंवा पॉलिसीचे दस्तऐवज समजत नसल्यास, तुम्ही ते आरोग्य विमा कंपनीकडे स्पष्ट केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे याबद्दल काही अडचणी निर्माण होणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button