आरोग्यलेटेस्ट

Health News : या’ लोकांनी पॅरासिटामॉल घेताना काळजी घ्यावी ! जीवघेण्या आजाराचा धोका वाढू शकतो…

जर एखाद्याचे अंग दुखत असेल किव्हा जास्त ताप असेल तर त्याच्यासाठी सर्वात सामान्य औषध दिले जाते, ती म्हणजे पॅरासिटामॉल. या औषधाने होणारा त्रास कमी होतो व तापही कमी होतो.

म्हणून याचा वापर बरेच लोक नेहमी करत असतात. पॅरासिटामॉलवर केलेल्या संशोधनानुसार समोर आले आहे की, हे औषध रोज घेतले तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

पॅरासिटामॉल हे एक वेदनाशामक आणि अँटीपायरेटिक औषध आहे, जे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नायू दुखणे, डोकेदुखी, दातदुखी, मोच, ताप इ. कमी करण्यासाठी वापरले जाते.

कोरोनाच्या काळात लसीकरणानंतर ताप आलेल्या लोकांना डॉक्टरांनी पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला दिला होता. बाजारात, हे औषध पॅरासिटामोल नावाने येते किंवा इतर काही औषधांमध्ये सक्रिय घटकांच्या रूपात मिळते.

या औषधाचा वापर लोक डॉक्टरांना न विचारता ताप किंवा त्रास होत असल्यावर करतात. पण नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे की, पॅरासिटामॉलच्या रोजच्या वापरामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका असलेल्या रुग्णांना पॅरासिटामॉल देण्यापूर्वी काळजी घेण्यासही संशोधकांनी डॉक्टरांना सांगितले आहे.

११० रुग्णांवर संशोधन केले – एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे संशोधन केले आहे. या अभ्यासात, अशा ११० लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांनी यापूर्वी उच्च रक्तदाबाची तक्रार केली होती.

या लोकांना १ ग्रॅम पॅरासिटामॉल दिवसातून ४ वेळा देण्यात आली. तर या संशोधनात असे आढळून आले की, ४ दिवसांनंतर त्यांचा रक्तदाब वाढला होता आणि त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता २० टक्क्यांनी वाढली होती.

या संदर्भात एडिनबर्ग विद्यापीठातील वैद्यकीय आणि क्लिनिकल फार्माकोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड वेब म्हणाले की, आम्ही नेहमी विचार करत आलो आहोत की, आयबुप्रोफेन/इबूप्रोफेन सारख्या रक्तदाब वाढवणारी औषधे वापरणे थांबवण्यासाठी पॅरासिटामॉल हा एक सुरक्षित पर्याय आहे.

परंतु संशोधन असे सुचवते की, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका असलेल्या रुग्णांनी पॅरासिटामॉल देणे बंद केले पाहिजे.

तसेच संशोधकांनी पुढे सांगितले की, ज्या लोकांना शरीरात आधीपासून त्रास होण्याची समस्या असल्याने ते पॅरासिटामॉल घेतात, अशा लोकांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेगळे औषध वापरावे.

या लोकांना नाही धोका – प्रोफेसर जेम्स डियर म्हणाले की, पॅरासिटामॉल घेतल्यानंतर २ आठवड्यांच्या आत रक्तदाब वाढू लागतो आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारखा धोका निर्माण होऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे आणि दर ३ पैकी १ व्यक्तीला याची तक्रार असते. जसजसे वय वाढते तसतसा त्याचा धोकाही वाढतो.

डॉ. इयान मॅकइन्टायर, एनएचएस लोथियन येथील क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि नेफ्रोलॉजी सल्लागार म्हणाले की, जे अधूनमधून पॅरासिटामॉल घेतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

हा धोका अधूनमधून पॅरासिटामॉल वापरणाऱ्यांसाठी नाही. तर जे बर्याच काळापासून ते घेत आहे किंवा दररोज घेतात त्यांच्यासाठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button