Health Tips : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका

हाय बीपी, डायबेटीस, हृदयविकार आदी समस्या जाणवत असल्यास कोलेस्टेरॉल वाढू लागला असे समजावे.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन टाळावे.
नेमके कोणते आहेत हे पाच पदार्थ जाणून घ्या
मैद्याचे पदार्थ : मैद्यापासून तयार केलेले केक, बिस्कीट, कुकीज, बेकरीत तयार होणारे पदार्थ हे खाणे कायमचे बंद करा.
चीझ आणि बटर : या दोन्ही पदार्थांमध्ये सॅच्युरेटेडे फॅट मोठ्या प्रमाणात असते. हे फॅट शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.
तेलकट पदार्थ : तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे हे पदार्थ खाणे बंद करा.
रेड मीट,:पाकिटबंद मीट हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे हे पदार्थ खाणे बंद करा.
साखरेचे गोड पदार्थ : मधुमेहाचा त्रास असेल अथवा कोलेस्टेरॉलचा त्रास होत असेल तर साखरेचे गोड पदार्थ खाणे बंद करणे हिताचे आहे.