अहमदनगर

हृदयद्रावक घटना: टेम्पो- दुचाकी धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू

अहमदनगर- टेम्पो-दुचाकी अपघातात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर घडली. रोहिणी गणेश गर्जे (वय १९ वर्षे रा.वडुले ता. नेवासा) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

रोहिणी गर्जे या आपल्या सासऱ्या सोबत कुकाणा येथे दवाखान्यात गेल्या होत्या. कुकाण्यातून दुचाकीवरून घरी जात असताना चिलेखनवाडी गावा जवळ नेवासा-शेवगाव रस्त्यावर सदर दुचाकीला पाठीमागून आलेल्या टेम्पोची जोराची धडक लागून झालेल्या अपघातात रोहिणी गर्जे यांचा मृत्यू झाली. तर त्यांचे सासरे रामदास हरिभाऊ गर्जे हे जखमी झाले आहेत.

 

सदर घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस दुरक्षेत्राचे अंमलदार नितीन भताने, तुकाराम खेडकर, अमोल साळवे हे घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर वडुले येथे रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात असून याबाबत रामदास हरिभाऊ गर्जे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून टेम्पो चालक परमेश्वर हाऊसराव आमले (रा. आंभोरा, ता.आष्टी, जि. बीड) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button