जिल्ह्यात जोरदार पाऊस ! नगर, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्या…
अशा आशा निर्माण झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात रोज पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.

दीड महिन्यानंतर जिल्ह्यात प्रथमच सलग पाऊस पडत आहे. उत्तरा नक्षाच्या अखेरीस जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने रब्बी हंगाम तरी चांगला घेता येईल,
अशा आशा निर्माण झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात रोज पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला. त्यातही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या.
मात्र, त्यानंतर पावसाने मोठी दडी दिली. ठराविक अंतराने रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे खरिपाची पिके जगली असली तरी उत्पादनात घट येणार असल्याचे सांगण्यात येते. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात गणेश चतुर्थीपासून हलका पाऊस पडायला सुरुवात झाली.
गुरुवारी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी व रविवारी अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
ओढे, नाले वाहू लागले. तलाव, बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले. मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस झाला नव्हता. मात्र, दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यानंतर रात्री पुन्हा काही काळ जोरदार सरी कोसळल्या. मंगळवारी दुपारी ४ वाजता नगर शहरात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातील रिमझिम पाऊस होता.
मात्र, पाच वाजेदरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरू होता. त्यानंतर रात्री सव्वाआठ वाजेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अकोले तालुक्यातील पूर्व भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. तर कोपरगाव तालुक्यातीलदहिगाव बोलका, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, राहाता तालुक्यातील पुणतांबा, म्हैसगाव येथे चांगला पाऊस झाला.
मोटारसायकलवरून मुलीला शाळेतून घेऊन येत असताना अंगावर वीज पडून वडील व मुलगी जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यात घडली.
मठाचीवाडी रांजणी रस्त्यावर आमले वस्तीजवळ वीज कोसळली. त्यात वडील रवींद्र साहेबराव तांगडे (३६) व मुलगी मनस्वी रवींद्र तांगडे (६ वर्ष) असे दोघे जखमी झाले.
जवळ राहणाच्या ग्रामस्थांनी मदत करत त्यांना उपचारांसाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. र वींद्र तांगडे हे दहिगाव ने येथील लोकनेते मारातरावजी घुले पाटील महाविद्यालयात संगणक शिक्षक आहेत. त्यांची कन्या मनस्वी तांगडे ही दहिगाव ते येथील पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.