अहमदनगर

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; पाणीसाठा झाला ‘इतके’ टक्के

अहमदनगर – जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणात गत 24 तासांत नव्याने 335 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे भंडारदरातील पाणीसाठा काल (शुक्रवारी) सकाळी 3604 दलघफू (32.68टक्के) झाला आहे.

काल शुक्रवारी दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद भंडारदरात 45 मिमी झाली आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 3744 दलघफू (33.92टक्के) झाला आहे. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 34 टक्क्याच्या पुढे सरकला होता.

भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघरमध्ये तब्बल आठ इंच तर पांजरेत सात इंच पाऊस नोंदवला गेला. पावसाने जोर पकडल्याने डोंगर दर्‍यांमधून वाहणारे धबधबे रौद्र रूप धारण करू लागले आहेत.

ओढेनालेही भरभरून वाहत असून धरणात विसावर आहे. त्यामुळे धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे. आतापर्यंत धरणात नव्याने 1359 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. वाकी धरणातही आवक होत असल्याने साठा हळूहळू वाढत आहे.112 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 88.39 दलघफू (78.46)टक्के झाला आहे. पावसाचे प्रमाण पाहता आज हे धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

निळवंडे धरणातही नव्याने पाणी येत आहे. काल 11 दलघफू पाणी आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3602 झाला आहे. वाकी धरण भरल्यानंतर या धरणात आणखी पाण्याची आवक वाढेल. या भागातील जनजीवन गारठू लागल्याने धुण्याही पेटू लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button