अहमदनगरताज्या बातम्यापारनेर

आमदार निलेश लंके यांचा नवा विक्रम ! होतेय राज्यात चर्चा..

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या दहा महिन्यांमध्ये राज्याच्या मतदारसंघासह विविध जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना आमदार नीलेश लंके यांनी ५० लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

राज्यातील २८८ आमदारांमध्ये आ. लंके हे अशी मदत मिळवून देण्यात अव्वल ठरले आहेत गेल्या दहा महिन्यांच्या कालवधीत मुख्यमंत्री सहाययता निधीमधून राज्यातील आठ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत करण्यात आली असून, त्यापैकी ५० लाख रुपयांची मदत एकटया आ. नीलेश लंके यांनी विविध रुग्णांना मिळवून देत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली राज्यातील दारिद्रयरेषेखालील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ६० टक्क्यांपर्यंत मदत केली जाते. आ. लंके हे राज्यभर दौरे करीत असताना त्यांच्याकडे अनेक रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय खर्चासाठी मदत मिळवून देण्याची मागणी करतात.

आ. लंके हे अशा प्रत्येक व्यक्तीची दखल घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबरच इतर सेवाभावी संस्थांकडूनही मदत मिळवून देत असतात.

त्यांच्या विधानसभा सदस्यपदाच्या कारकीर्दीत त्यांनी हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या अव्दितीय कामगिरीमुळे त्यांची राज्यात,

देशात वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्यामुळे रुग्णांचे नातलग आ. लंके यांच्याशी संपर्क करतात व लंकेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शक्य होईल तितकी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात

स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक

पैशांअभावी एखाद्या रुग्णावरील उपचार थांबू नयेत, यासाठी आपण सदैव दक्ष असतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अथवा इतर सेवा भावी संस्थांकडून मदत मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आपण आपल्या संपर्क कार्यालयात या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच इतर सेवा भावी संस्थांच्या नियमित संपर्कात असतो, त्यामुळे मोठया प्रमाणावर मदत मिळवून देणे मला शक्य होते. नीलेश लंके, आमदार, पारनेर-नगर मतदारसंघ

Related Articles

Leave a Reply

Back to top button