अहमदनगर

Ahmednagar News | ‘येथे’ घरफोडी करून घरातील सामान चोरले

गुलमोहर रोडवर असलेल्या तांबटकर मळा परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. घरातील दोन गॅस सिलेंडरसह इतर सामान चोरट्यांनी चोरून नेले आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विठ्ठल लोखंडे (वय 36 रा. तांबटकर मळा, गुलमोहर रोड, हल्ली रा. वाघोली, ता. जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

लोखंडे हे कुटुंबासह वाघोली येथे राहत असून त्यांचा तांबटकर मळा परिसरात एक फ्लॅट आहे. महिन्यातून एक ते दोन वेळेस ते त्या ठिकाणी राहत असतात.

रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान फिर्यादी लोखंडे हे त्यांच्या आईसह नगर शहरातील त्यांच्या घरी आले असता घर उघडल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी सर्व सामानाची पाहणी केली असता दोन गॅस सिलेंडर, दोन मिक्सर, एक पितळी हंडा, सहा साड्या तसेच पितळी तांबे यांची चोरी झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button