अहमदनगर
‘येथे’ चोरट्यांचा डाँलरवर डल्ला

उघड्या असलेल्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रूपये भारतीय मुल्य असलेले युएसडीचे चलण (1200 डाँलर) व 20 हजार रूपये रोख रक्कम असा 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप अजय गांगुले (वय 29 रा. पोखर्डी, ससेवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. 12 मे ते 13 मे दरम्यान ही घटना घडली आहे.
फिर्यादी यांचे घर उघडे असताना चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील पेटीवर ठेवलेले डाँलर व रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महमंद शेख करीत आहेत.