अहमदनगर

‘येथे’ दोन गट भिडले; तुंबळ हाणामारी

किरकोळ कारणातून दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बोल्हेगाव उपनगरात घडली. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

29 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काही व्यक्तींनी आमच्या घरात प्रवेश केला.‘तुझा भाऊ कुठे आहे’, असे म्हणत विनाकारण मारहाण केली.

दुसर्‍या दिवशी साफसफाई करत असताना काही व्यक्ती घरासमोर आल्या व त्यांनी गैरवर्तन करत विनयभंग केला व मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दोन्ही गटाच्या व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल केले असून त्यातील तिघांना अटक केली आहे. 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मुलीला एकाने,‘तु मला आवडतेस’, असे म्हटले.

माझ्या मुलीने त्याला विरोध केला. घडलेल्या घटनेनंतर समजून सांगण्यासाठी गेल्यानंतर माझ्यासह माझ्या दोन मुलींना मारहाण करण्यात आली.

यासंदर्भात तोफखाना पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही दुसर्‍या दिवशी मंगळवारी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. गैरवर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button