टेक्नॉलॉजी

Hero Glamour: सर्वसामान्यांची बाइक लॉन्च ! 63kmpl मायलेजसह किंमत आहे फक्त…

Hero MotoCorp ने आपले ग्लॅमर एका नवीन अवतारात सादर केले आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत माहिती देणार आहे.

Hero Glamour: भारतीय बाजारात अनेक दुचाकी लॉन्च होत आहेत. मात्र गाड्यांच्या किमती आणि मायलेजचा विचार केला तर सर्वसामान्य लोकांसाठी त्या खरेदी कारण खूप अवघड असते.

अशा वेळी आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय बाजारात एक नवीन बाईक लॉन्च झाली आहे जी तुम्हाला खूप परवडणारी आहे. ही बाइक Hero MotoCorp, कंपनीने आणली आहे.

दरम्यान, हिरो ग्लॅमर असे या नवीन बाईकचे नाव आहे. कंपनीने हे नवीन फीचर्स आणि अपडेटेड इंजिनसह लॉन्च केले आहे. या बाईकच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही जाणून घ्या.

हिरो ग्लॅमर: इंजिन

या बाईकचे इंजिन सर्व-नवीन ग्लॅमर 125cc सिंगल-सिलेंडरद्वारे समर्थित आहे जे 7,500rpm वर 10.72bhp ची कमाल पॉवर आणि 6,000rpm वर 10.6Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या मोटरसोबत पाच-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे.

यात 18 इंची अलॉय व्हील्स आहेत. सुरक्षेचा विचार करून कंपनीने पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिला आहे. मोटरसायकलमध्ये Hero MotoCorp चे i3S (Idle Stop-Start System) तंत्रज्ञान आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक 63 किमी प्रति लीटर मायलेज देते.

लूकवर नजर टाकली तर नवे ग्लॅमर पूर्वीसारखे दिसते. यात मस्क्यूलर इंधन टाकी, सिंगल पॉड रिफ्लेक्टर हेडलाइट सेटअप, सिंगल पीस सीट, सिंगल पीर ग्रॅब रेल आहे.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हिरोच्या या नवीन बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे जो रियल टाइम मायलेज इंडिकेटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, लो फ्युएल इंडिकेटर यासारखी माहिती देतो. याशिवाय रायडरच्या सोयीसाठी यामध्ये यूएसबी चार्जरचा सपोर्टही उपलब्ध आहे, ज्यामुळे तो राइड दरम्यान त्याचा फोन चार्जही करू शकतो.

हिरो ग्लॅमरची किंमत किती आहे?

आता, किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Hero ने 86,348 रुपयांमध्ये न्यू ग्लॅमरचा डिस्क ब्रेक प्रकार सादर केला आहे. त्याच वेळी, ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 82,348 रुपये आहे. या एक्स शोरूम किमती आहेत. हे कँडी ब्लेझिंग रेड, टेक्नो ब्लू-ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड-ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button