अरे अरे… हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले …! आता मात्र पोलिसांनी….?

एकीकडे बदलत्या काळानुसार विवाहात हुंडा देणे व घेणे जवळपास बंद झाले असतानाच दुसरीकडे मात्र हुंड्यासाठी अनेक विवाहीत महिलांना सासरच्या छळाला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
नुकतीच विवाहितेने माहेरहून हुंडा आणावा यासाठी तिचा मानसिक व शारिरीक छळ करत उपाशीपोटी ठेवुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु, सासरा, दीर व नणंद या पाच जणांविरुध्द पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील विवाहित महिला अनिता नागेश शिरसाठ हिने माहेराहुन हुंडा आणावा यासाठी नागेश शिरसाठ (पती), मच्छिंद्र शिवाजी शिरसाठ (सासरा), शहाबाई मच्छिंद्र शिरसाठ (सासु),
महेश मच्छिंद्र शिरसाठ (दिर) व सुनिता मारोती सानप (नणंद, रा.तागडगाव ता.शिरूर कासार, जि.बीड) यांनी मानसिक व शारिरीक छळ करून उपाशी ठेवुन अनिता हिस आत्महत्येस प्रवृत्त केले.
याबाबत मयत अनिता हिची आई नंदाबाई जयसिंग सानप यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात वरील जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.