अहमदनगर

अरे अरे! ‘ती’ कोसळली थेट म्हशीवरच

नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वाळी वारे व पावसाने बरेच नुकसान देखील झाले आहे.

यात नगर तालुक्यातील वडगाव येथील गणेश सुभाष रणसिंग या शेतकऱ्याच्या म्हशीच्या अंगावर वीज कोसळल्याने ती ठार झाल्याने त्यांचे मोेठे आर्थीक नुकसान झाले आहे.

संध्याकाळी वादळीवाऱ्यासह पावसास सुरवात झाली होती. गणेश सुभाष रणसिंग यांची गौरी नावाची म्हैस अंगणात बांधलेली होती. त्या पावसा दरम्यान या म्हशीच्या अंगावर वीज कोसळुन म्हैस जागीच दगावली.

या घटनेची खबर महसूल विभागास दिल्यानंतर महसूल विभागाचे तलाठी श्रीनिवास गौडा यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे.

रणसिंग यांची अंदाजे ९० हजार रुपये किंमतीची म्हैस दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यांत रणसिंग कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. या नैसर्गिक आपत्तीतुन सावरण्यासाठी आथिर्क नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी रणसिंग कुटुंबाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button