अहमदनगर

कारची दुचाकीला धडक; वृध्दाचा मृत्यू

कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वृध्दाचा मृत्यू झाला आहे. रंगनाथ मनाजी बोरूडे (वय 62 रा. खोसपुरी ता. नगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत रंगनाथ बोरूडे यांचे नातू सतिष भाऊसाहेब कदम (वय 21 रा. खोसपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. रंगनाथ बोरूडे हे त्यांच्याकडील दुचाकीने अहमदनगर-औरंगाबाद रोडवरून प्रवास करत असताना

भरधाव वेगाने आलेल्या कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या रंगनाथ बोरूडे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक दीपक गांगर्डे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button