प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला धडक देत त्याने दिली बलात्काराची धमकी

मुंबईत अभिनेत्री माही विज हिच्या गाडीला भर रस्त्यात एकाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीने अभिनेत्री माही हिला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिली आहे. याबाबत खुद्द माही हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे.
या व्हिडीओत एक व्यक्ती तिच्या गाडीला धडक देऊन छेड काढत पळताना दिसत आहे. यात त्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांकही दिसत आहे. पोस्ट मध्ये ती म्हणाली, “या व्यक्तीने आधी माझ्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ करत बलात्काराची धमकीही दिली. कृपया मुंबई पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.”
दरम्यान माहीच्या या ट्विटवर मुंबई पोलिसांनी उत्तर दिलेय. तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा, याची दखल घेतली जाईल”, असे त्यांनी या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना घडली त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी ताराही सोबत होती.
माहीचे सिनेकरिअर विषयी जाणून घ्या
माही विज एक टीव्ही अभिनेत्री आहे. २००९ साली तिने ‘शुभ कदम’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तेरी मेरी लव्ह स्टोरी’, ‘नच बलिये’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘सावधान इंडिया’, ‘झलक दिखलाजा’ यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये ती झळकली आहे.