भाडोत्री घर खाली करण्यासाठी घरमालकाचे दोघां बहिणीसोबत गैरवर्तन

भाड्याने राहत असलेले घर खाली करण्यासाठी घरमालकाने दोघा बहिणांना मारहाण केली. त्यातील एकीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नरेश भूमकर, गौरी जाधव व दोन अनोळखी महिला यांचा समावेश आहे.
फिर्यादी महिला गेल्या अनेक दिवसांपासून नरेश भूमकर यांच्याकडे भाड्याने राहतात. बुधवारी सकाळी फिर्यादी व त्यांची बहिण घरी असताना तेथे नरेश भूमकर, गौरी जाधव व दोन अनोळखी यांनी बळजबरीने घरात प्रवेश केला.
लवकर घर खाली करा, मी आज तुमचे सामान बाहेर फेकणार आहे, असे म्हणत नरेश फिर्यादीवर धावून आल्या. त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.
त्यांच्या बहिणीला देखील मारहाण केली. नरेशने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 354 ब, 452, 323, 427, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.