Honda electric Car : होंडा वाढवणार सर्वांची डोकेदुखी ! बाजारात आणणार स्टायलिश बोल्ट लूक असणारी इलेक्ट्रिक कार
होंडा बाजारात एक नवीन कार आणणार आहे. ही एक इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे, जी दिसायला खूप आकर्षक आहे.

Honda electric Car : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होंत आहेत. मात्र लोक सर्वात जास्त स्टायलिश कार खरेदी करण्याकडे लक्ष देत असतात. अशा वेळी आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.
कारण आता बाजारात होंडा एक नवीन कार आणणार आहे. आपल्या शक्तिशाली एसयूव्ही कार एलिव्हेटनंतर, होंडा ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. या इलेक्ट्रिक कारला हाय रेंज आणि स्टायलिश फ्रंट लुक देण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या टोकियो मोटर शोमध्ये कंपनी या अप्रतिम कारचे अनावरण करणार आहे.
होंडा ई कारच्या एक पाऊल पुढे
कंपनीने कारला स्पोर्ट्स लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. ही कंपनीची नवीन पिढीची कार आहे ज्यात टचस्क्रीन डिस्प्ले आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग आणि एबीएसची सुरक्षा असेल. कारमध्ये मोठ्या आकाराचे टायर आहेत.
तसेच या कारमध्ये सर्व एलईडी लाइट्स दिले जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची ही कार Honda E वर आधारित असू शकते. मात्र, कंपनीने अद्याप आपल्या नवीन EV कारबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
ही कार SUSTANIA-C संकल्पनेवर तयार करण्यात आली आहे
होंडाची ही नवीन कार अतिशय बोल्ड लूकमध्ये बनवण्यात आली आहे. कंपनीची ही नवीन गोंडस इलेक्ट्रिक कार एक अनोखी हॅचबॅक कार आहे, जी कंपनीने खास SUSTANIA-C संकल्पनेवर तयार केली आहे. हा प्लॅटफॉर्म कारला हाय स्पीड देण्यास मदत करतो. तसेच या कारसोबतच आता होंडा नवीन ई-स्कूटरही आणणार आहे. यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी पॅक असेल.
ही कार 145 kmph चा टॉप स्पीड देते
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात आधीच उपलब्ध असलेली Honda E कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 170 किलोमीटरची रेंज देते. या कारमध्ये 28.5 kwh चा बॅटरी पॅक आहे. ही कार 145 kmph चा टॉप स्पीड देते. Honda e कार 9 सेकंदात 100 kmph चा वेग गाठते. ही मस्त कार 315 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 400 वॅटची लिथियम बॅटरी आहे. ही कार पाच तासांत पूर्ण चार्ज होते.
होंडा ई कारची लांबी 3894 मिमी
होंडा ई कारची लांबी 3894 मिमी, रुंदी 1752 मिमी आणि उंची 1512 मिमी आहे. कारचा व्हील बेस 2538 मिमी आहे. ही कार 342 किलो वजन सहज वाहून नेऊ शकते. ही हॅचबॅक 4 सीटर कार आहे. यामध्ये मोठे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. अशा प्रकारे तुमच्यासाठी ही एक उत्तम कार आहे.