Honda Shine 125 : होंडाच्या ‘या’ स्टायलिश बाईकने ग्राहकांचे मन जिंकले, 80 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतात शक्तिशाली फीचर्स
Honda Shine 125 मध्ये आकर्षक पाच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचे इंजिन 10.3 hp ची पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करते.

Honda Shine 125 : भारतीय बाजारात होंडा हे खूप मोठे नाव आहे. होंडाच्या बाइक या अतिशय स्टायलिश बाइक्स म्हणून ओळखल्या जातात. व लोक त्या मोठ्या प्रमाणात खरेदी देखील करत आहेत.
जर तुम्हीही होंडाच्या बाईकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण सध्या बाजारात Honda Shine 125 ही बाइक ग्राहकांचे मन जिंकत आहे. या बाईकला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात खरीदी करत आहे. दरम्यान तुम्हीही ही बाइक खरेदी करणार असाल तर या बाइकबद्दल जाणून घ्या…
मागील बाजूस पाच-गिअरबॉक्स
या बाइकला 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस पाच-स्टेप अॅडजस्टेबल हायड्रॉलिक-प्रकारचे शॉक सस्पेंशन मिळते, ज्यामुळे रायडरला आरामदायी राइड मिळते. तसेच खराब रस्त्यावर देखील दुचाकीस्वाराला ही बाइक चालवताना अडचणी येत नाहीत.
समोर डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक
बाईकच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत. Honda Shine 125 ला हॅलोजन हेडलॅम्प, स्टार्ट/स्टॉप इंजिन स्विच आणि इंधन गेजसह अॅनालॉग स्पीडोमीटर मिळेल. ही बाईक बाजारात 79,800 हजार रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
शक्तिशाली 125 सीसी इंजिन
बाईकचे पॉवरफुल इंजिन 93 किमी/ताशी टॉप स्पीड देते. यात 123.94 cc चे मजबूत इंजिन आहे. Honda Shine 125 चे कूल इंजिन 10.3 hp पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या बाजारात दोन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहेत.
बाईक 60 किमी/ली मायलेज देते
कंपनीने बाजारात Honda Shine 125 हे आकर्षक पाच रंग पर्याय ज्यामध्ये ब्लॅक, जिनी ग्रे मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे, रिबेल रेड मेटॅलिक आणि डिसेंट ब्लू मेटॅलिकमध्ये सादर केले आहेत. तसेच ही कंपनीची हाय परफॉर्मन्स बाईक आहे, जी रस्त्यावर 60 km/l मायलेज देते.
शक्तिशाली सिंगल सिलेंडर इंजिन
ही बाईक बाजारात Hero Super Splendor आणि Bajaj Pulsar 125 शी स्पर्धा करते. Honda Shine जबरदस्त सिंगल सिलेंडर इंजिनसह येते. यामध्ये, कंपनी सिंगल सीट ऑफर करते, जी लांब मार्गांसाठी रायडरचा थकवा कमी करण्यास फायद्याचे आहे.