अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा हनीट्रॅप ! पंचायत समिती सदस्याला ४०.५० लाखाला गंडवले

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील डाळिंब उत्पादक शेतकरी व पंचायत समिती सदस्य शिवाजी उर्फ विष्णू राहटल यांना अनैतिक संबंध असल्याचे भासवून व व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत ४० लाख ५० हजाराला गंडा घातला आहे.

या संदर्भात शिर्डी पोलिसांनी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यात एक महिला परिचारिकेचा समावेश आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे समोर येत आहे.

महिला तालुक्यातील सुकेवाडी येथे तर ब्लॅकमेल करणारी व्यक्ती लोणी येथे राहते. राहटळ संगमनेर पंचायत समिती सदस्य असल्याने परिचारिकेची जवळे कडलग येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन ओळख झाली.

ओळखीतून पैशाची देवाण-घेवाण वाढली. राहटळ यांनी महिलेला वेळोवेळी पैसे दिले. मात्र पैशाची मागणी करताच ती फोन उचलत नसे. तिने तद्नंतर बाभळेश्वर येथे एका हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी बोलावले.

मात्र तिने व त्या व्यक्तीने अश्लील व्हिडीओ काढण्याच्या प्रयन्त करून फोनमध्ये रेकॉर्डिंग समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या माध्यमातून दोघांनी ब्लॅकमेल करत जवळपास ४० लाख ५० हजार रुपये उकळले आहे.

या संदर्भात विष्णुपंत राहटल यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे पोलिस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुलाबराव पाटील तपास करत आहे.

दरम्यान, या परिचारिका महिलेने अनेकांना गंडवल्याची शहरात चर्चा आहे. पोलिस तपासात अनेक घटना पुढे येणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button