अहमदनगर

भंडारदरा धरण किती भरले; निळवंडे आणि मुळा धरणाची काय आहे स्थिती

अहमदनगर- मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसामुळे मुळा नदीवरील 600 दलगफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही बुधवारी ओव्हरफ्लो झाले.
दरम्यान अकोले शहर, परिसरात आज दुपारपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. दुपारपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आजच्या या पावसामुळे शेतकऱ्यांची खोळंबलेली शेतीची कामे सुरू होऊ शकतील.

मुळा -भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे ,नाले,धबधबे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे. त्यामुळे कृष्णवंती नदीवरील वाकी लघु पाटबंधारे तलाव आज शनिवारी दुपारी १:०० वाजता पुर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता ११२ दलघफू आहे. हा लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे निळवंडे जलाशयाचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

मुळा- भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे भातशेतीला संजीवनी मिळाली आहे. तसेच धरणातही नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे.

जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मात्र संततधार पाऊसास सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे . या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना काहीसा दिलासा मिळाला, आहे . पावसाअभावी सुकून चाललेल्या भातरोपांना देखील नवसंजीवनी मिळाली आहे.

कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला, तर निसर्ग सौंदर्य देखील हळूहळू खुलू लागले आहे. या पावसाच्या पाण्याने डोंगर दऱ्यातील झरे वाहते झाले आहे.
दरवर्षी प्रथम भंडारदरा पाणलोट क्षेत्रात व मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी उर्वरित जिल्हा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असतो. यंदा मात्र जिल्हाभर पाऊस कोसळत असताना भंडारदरा पाणलोट क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून, पावसाला सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणात 3896 दलघफू तर निळवंडे धरणात 3684 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता.
कोतूळची आवक दोन हजार क्युसेकने सुरू होती. पिंपळगाव खांड धरण भरल्या मुळे मुळा धरणातील पाण्याच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे पाणी साठे-व क्षमता
भंडारदरा- 3896/11039
निळवंडे -3634/8320
मुळा -8617/26000
आढळा- 413/1060
मागील 24 तासात पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे…
रतनवाडी -139
घाटघर- 112
भंडारदरा -96
वाकी- 73

Related Articles

Leave a Reply

Back to top button