अहमदनगर

जिल्ह्याला वरदान ठरलेल्या ‘या’ धरणात किती झाला पाणीसाठा

अहमदनगर – नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा (26000 दलघफू) धरणातील पाणीसाठा गत वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक साठा आहे. गत दोन दिवसापासून पाणलोटात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मुळा नदीचे पाणी कमी अधिक होत आहे.

 

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा आता 17011 दलघफू झाला होता. दरम्यान, मुळा पाणलोटात आषाढ सरींचा जोर ओसरल्याने मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 5327 क्युसेक होता.

 

डिंभे 66 टक्के; घोडमध्ये 72 टक्के पाणीसाठा

 

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे,डिंभे धरणांमधील एकूण पाणीसाठा (18117 दलघफू) 61टक्क्यावर गेला आहे.

 

गत वर्षी याच काळात केवळ 6520 दलघफू (22 टक्के) पाणीसाठा होता. पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍यातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 1260दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

 

येडगाव धरणात 94, माणिकडोह 50, वडज 76, पिंपळगाव जोगे 54, डिंभे 66 टक्के भरले आहे. पाणीसाठा मुबलक अल्याने येडगाव सांडवा विसर्ग 2800 क्युसेकने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कुकडी डाव्या कालव्याचा विसर्ग वाढवून तो 1400 क्युसेक करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button