आरोग्यताज्या बातम्या

ऑक्टोबर हीटपासून आपल्या त्वचेसह शरीराचे रक्षण कसे कराल ?

ऑक्टोबर हीटपासून आपल्या त्वचेसह शरीराचे रक्षण आवश्यक आहे. वाढत्या उन्हामुळे वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत.

Health News : सप्टेंबर संपला, ऑक्टोबरही निम्मा सरला. पावसाळा सरला आहे. आता पाऊस येईल याची शक्यता कमीच आहे. ऑक्टोबर महिन्यात आता रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन असा अनुभव येत आहे.

ऑक्टोबर हीटपासून आपल्या त्वचेसह शरीराचे रक्षण आवश्यक आहे. वाढत्या उन्हामुळे वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. त्याचे आरोग्यावरदेखील गंभीर परिणाम होतात. त्यामुळे आरोग्याचे रक्षण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या तापमानाचा पारा ३२ ते ३५ अंशांवर पोहोचला आहे. दिवसभर कडक ऊन असते. उकाडा वाढल्याने या दिवसातही कूलर, एसी, पंखे लावावे लागत आहेत. बुधवारी कमाल ३३ अंश इतके होते.

Advertisement

ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि थंडी आणि उन्हाळा अशा दोन ऋतूंचा अनुभव येत आहे. सध्या दिवसा कडक ऊन तर रात्री थंडी असते.

सध्या दिवसभर ऊन तापल्यामुळे सायंकाळी काही वेळ उकाडा जाणवतो. रात्री १२ नंतर गारवा व दोन वाजल्यानंतर थंडी जाणवते. ऋतू बदलामुळे अनेकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

कोरडी त्वचा कोरडी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर त्वचा मऊ रुमालाने हळुवार पुसून घ्यावी. जोर देऊन त्वचा पुसू नये. तीन ते पाच मिनिटांच्या आत मॉइश्चराइजर लावा

Advertisement

तेलकट त्वचा: तेलकट त्वचा असणाऱ्यांांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, चरबी, स्टार्च असणारे पदार्थ, गोड, मसालेदार, तेलकट, चमचमीत, झणझणीत तुपकट पदार्थ टाळावेत. आठवड्यातून एकदा तरी चेहयावर वाफ घ्यावी.

ऑक्टोबर महिन्यात योग्य काळजी व खबरदारी घेतली नाही तर त्याचा परिणाम त्वचेसह आरोग्यावर होतो. दिवसभरातून किमान ४ ते ५ वेळा थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे.

त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी रात्रीचे जागरण टाळावे. आहारात फळे, दूध-दही यांचा वापर करावा व तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button