अहमदनगर

Ahmednagar Crime : विवाहितेचा विनयभंग करत पतीसह तिघांना मारहाण

Ahmednagar Crime: सुभाष गोविंद मुदळ या व्यक्तीने नगर तालुक्यातील एका विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पतीसह कुटूंबातील इतर सदस्यांना मारहाण केली.

या प्रकरणी पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष मुदळ विरोधात विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता सुभाष मुदळ याने फिर्यादीचा हात पकडून वाईट शब्द बोलून विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला असता तिच्या पतीसह कुटूंबातील इतर दोघे त्याठिकाणी आले.

त्यावेळी सुभाष मुदळ याने त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत तेथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जी. एस. लबडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button