अहमदनगर

Ahmednagar Crime : पतीला मारहाण करत पत्नीला घेेतला चावा

किरकोळ कारणातून पतीला मारहाण करत पत्नीला चावा घेतल्याची घटना सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरात घडली.

या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. अमोल साठे व दीपीका साठे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कान्होपात्रा तुकाराम गाडेकर (वय 35 रा. तपोवन रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

रात्री फिर्यादी घरासमोर टँकरमध्ये पाईप टाकून पाणी भरत होत्या. त्यावेळी अमोल साठे दारू पिऊन तेथे आला. त्याने टँकरमधील पाईप काढून टाकला.

फिर्यादी यांचे पती तुकाराम गाडेकर जाब विचारण्यासाठी गेले असता अमोलने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी दीपीका साठे तेथे आली व तिने फिर्यादीला मारहाण करत खांद्याजवळ चावा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button