Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : पतीने दिली हरवल्याची तक्रार, पत्नीचा पाटात आढळला मृतदेह, धक्कादायक...

Ahmednagar News : पतीने दिली हरवल्याची तक्रार, पत्नीचा पाटात आढळला मृतदेह, धक्कादायक सत्य समोर

Ahmednagar News : एका विवाहितेचा मृतदेह घोडेगांवच्या पाटात आढळून आला आहे. पतीने विवाहितेची सोनई पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिलेली होती.

या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर मात्र या घटनेला नाट्यमय वळण लागले. सदर मृत महिलेने आत्महत्या केली की तीचा सासरच्या लोकांकडून खून झाला याचा उलगडा पोलीसांनी करावा नंतरच मृतदेह ताब्यात घेवू अशी भूमिका तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतली.

अखेर मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, भाया या चौघांवर गुन्हा दाखल केला.

ही घटना रविवार (दि.२८) रोजी दुपारी घडली असून मोनिका रामकृष्ण पटारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. रामकृष्ण शिवाजी पटारे असे तिच्या पतीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : ही घटना रविवार (दि.२८) रोजी दुपारी तीन वाजता घडली.घोडेगांव (ता.नेवासा) येथील विवाहिता मोनिकाचा रामकृष्ण पटारे याच्या बरोबर विवाह झाला होता. त्यांचे अलीकडील काही काळात भांडणे होत होती.

दरम्यान रामकृष्ण यांनी सोमवारी रात्री ११ वाजता विवाहितेच्या वडीलांना मोनिका आणि माझे भांडण झाल्याचे सांगितले होते.

यानंतर पतीने विवाहितेची सोनई पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिली होती व त्यानंतर विवाहितेचा मृतदेह घोडेगावच्या पाटात सापडला.

 सासरच्या लोकांनी घात केल्याचा संशय

सासरच्या लोकांनी मुलीचा घात केल्याचा संशय विवाहितेच्या वडिलांनी पोलीसांकडे व्यक्त केला. पिकअप गाडी आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता असा आरोप त्यांनी केला.

विवाहितेचे वडील राजेंद्र मारुती वालतुरे रा.घुमनदेव (ता.श्रीरामपूर) यांनी नेवासे पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीवरून विवाहितेचा पती रामकृष्ण शिवाजी पटारे, सासरा शिवाजी देवराव पटारे, सासू शांताबाई शिवाजी पटारे, भाया अनिल शिवाजी पटारे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments