अहमदनगर

अनैतिक संबंधात अडसर ठरला : पत्नीनेच काढला पतीचा काटा

अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याच्या कारणातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड उघडकीस आला आहे.

या खून प्रकरणात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यालयासमोर हजर केले असता यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ विशाल सुर्वे याचा जितो टेम्पो अडवून कोणीतरी अज्ञात हल्लेखोरांनी विशालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून त्यचा खून केला होता.

ही घटना शुक्रवार दि.१३ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी जामखेड पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी वेगवेगळी तपास पथके तयार केली होती. पोलिसांच्या तपासात स्थानिक भागातील अनेकांवर संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी कसून तपास केला असता मयत विशाल सुर्वेचा खून त्याच्याच जवळच्या लोकांनी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जामखेड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपी कृष्णा संजय सुर्वे, श्रीधर राम कन्हेरकर, पुजा विशाल सुर्वे या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींमध्ये मयताच्या पत्नीचा समावेश असल्याने चांगलीच खळबळ उडाली. मयत विशाल सुर्वे हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आरोपी कृष्णा संजय सुर्वे याने मयताच्या पत्नीशी आणि त्याच्या मित्राशी संगनमत करून विशाल याचा खून केल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे.

आरोपींनी विशाल याची अतिशय निर्घूणपणे हत्या केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button