Hyundai Creta News : ह्युंदाईच्या या लोकप्रिय SUV कारने विकली तब्बल इतकी युनिट्स! टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला टाकले मागे
ह्युंदाई कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या एका SUV कारणे टाटा मोटर्सच्या Nexon कारला देखील मागे टाकले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कंपनीने या वर्षी सर्वाधिक कार विकल्या आहेत.

Hyundai Creta News : ह्युंदाई कंपनीच्या कारची देशामध्ये दिवसेंदिवस क्रेझ वाढू लागली आहे. ह्युंदाई कंपनीच्या कार देशामध्ये विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच ह्युंदाई कंपनीच्या काही कार देशामध्ये अधिक लोकप्रिय झाल्या आहेत.
ह्युंदाई कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून मिड सेगमेंट SUV सादर केल्या जात आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई कंपनीच्या SUV कारला भारतामध्ये अधिक मागणी आहे.
क्रेटाने जूनमध्ये 14,447 युनिट्सची विक्री केली
ह्युंदाई कंपनीची क्रेटा SUV कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या कंपनीने क्रेटा SUV कारची जून 2023 मध्ये 14,447 युनिट्सची विक्री केली आहे. जी 2022 च्या जूनमध्ये 13,790 युनिट्स होती.
मागील जून महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या जून महिन्यामध्ये ५ टक्क्यांनी कारच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच जून महिन्यामध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण 13,827 युनिट्स आणि मारुती सुझुकी ब्रेझाच्या 10,578 युनिट्सची विक्री झाली आहे.
Tata Nexon ने 14,423 युनिट्स विकल्या
ह्युंदाई कंपनीच्या क्रेटा कारने टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Nexon कारला देखील मागे टाकले आहे. ह्युंदाई क्रेटा कारची मे 2023 मध्ये सर्वाधिक एकूण 14,449 युनिट्सची विक्री झाली आहे.
तसेच सर्वाधिक SUV कार विक्री करण्याच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे २०२३ महिन्यामध्ये या कारने 14,423 युनिट्सची विक्री केली होती. तर मे २०२२ मध्ये याच कारने 14,614 विक्री केली होती.
Hyundai Creta मध्ये शक्तिशाली 1.5 लिटर पेट्रोल इंजिन
ह्युंदाई कंपनीकडून त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 113 bhp ची उच्च शक्ती आणि 144 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये कंपनीकडून सहा मोनोटोन आणि एक ड्युअल टोन कलर ऑफर करण्यात येत आहे. तसेच या कारमध्ये डिझेलपर्याय देखील उपलब्ध आहे.
कार 21 kmpl मायलेज आणि किंमत
ह्युंदाई क्रेटा कार 21 kmpl मायलेज देते. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपयांपासून सुरु होते तर 19.20 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये 458 लिटरची मोठी बूट स्पेस देण्यात येत आहे.