Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरमी लाखांत नव्हे तर कोटीत निधी आणला त्यामुळे तुम्ही दाळ व गुळवाल्यांच्या...

मी लाखांत नव्हे तर कोटीत निधी आणला त्यामुळे तुम्ही दाळ व गुळवाल्यांच्या नादी लागू नका ..! आमदार निलेश लंके यांची टीका

Ahmednagar News : मी लाखांत नव्हे तर कोटीत निधी आणला आहे . मी स्वतः दहा – पाच लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन करत नाही. माझे कार्यकर्तेच करतात.

त्यामुळे जनतेने दाळ व गुळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नका . अशी टिका आमदार निलेश लंके यांनी खा . विखे यांचा नामोल्लेख टाळून केला आहे .

पारनेर तालुक्यातील निघोज येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. लंके पुढे म्हणाले की, आपल्या हक्काचा माणूस आहे , कधी ही मला आवाज द्या .

मी जे बोलतो , तेच करतो . खासदारांनी तालुक्याला खासदार निधी तून काय दिले ते त्यांनी सांगावे. त्यांनी जी कामे केली, ती सर्व जिल्हा परिषदेच्या निधीतून केली. मी माझ्या कामांचा आमदार निधीचा लेखाजोगा मांडतो. मी कधी ही समोरासमोर चर्चेला तयार आहे.

मी आमदार झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे कोरोनात गेले, एक वर्षे विरोधात गेले. आताच्या अवघ्या दीड वर्षात पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी विविध विभागातून १७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला . मी लाखांत नव्हे तर, कोटीत निधी आणला आहे .

मी स्वतः दहा – पाच लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन करत नाही , तर कार्यकर्त्यांना करायला सांगतो. आतापर्यंत निघोज मध्ये ७० कोटी रुपयांची विकास कामे केली असून आगामी काळातही विकास कामे करत राहणार आहे .

निघोज करांनी माझ्या वर प्रेम केले . मला भरभरून दिले . या प्रेमापोटी मी यातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो आहे . येथील कार्यकर्ते ही माझ्याकडे कामांची मागणी करताना अगदी साध्या कागदावर करतात.

मला त्यासाठी कोणताही प्रोटोकॉल लागत नाही . माझ्या ही स्वप्नातील पारनेर तालुका मला आता दिसून येत आहे . येथील पाणी , रस्ते व इतर प्रश्न जवळपास सुटले आहेत .

माझा सारखा भोळा आमदार निघोजकरांना भेटल्याने येथील पाट पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, पाण्याची कधीही अडचण येऊ दिली नाही व देणार ही नाही असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments