३५ मुलींशी माझे शारीरिक संबंध आहेत, तू माझ्याशी संबंध ठेव म्हणत तरूणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- जिवे मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीवर श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्याजवळील झाडीत शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२९) गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पसार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस पथके तयार केली आहेत.
याप्रकरणी पीयूष बाळासाहेब घोडके (रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीयूष घोडके याच्या विरोधात भादंवि कलम ३७६, ३२३. ५०६ पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीयूष घोडके हा पसार झाला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२२ मध्ये घडली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. ‘३५ मुलींशी माझे शारीरिक संबंध आहेत. तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला जिवे मारीन, अशी धमकी देत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
माझ्याकडे तुमच्या क्लिप आहेत. असे सांगून त्याने अनेक मुलींची छेडछाड केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची श्रीगोंद्यातील काही कार्यकत्यांनी भेट घेऊन माहिती दिली होती. त्यानंतर राकेश ओला यांनी मुलींची छेड काढणाऱ्याविरोधात कारवाई करा, असे आदेश दिले होते.