‘तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर फार प्रेम आहे’; असे म्हणत अल्पवयीन मुलीसोबत….

तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर फार प्रेम आहे’, असे म्हणत तरूणाने अल्पवयीन मुलीची फोनव्दारे व शाळेमध्ये येता-जाता पाठलाग करून छेड काढल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोकत शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अहमदनगर शहरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. मागील एक वर्षापासून ते 5 एप्रिल, 2022 दरम्यान ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मागील एक वर्षांपासून शोकत शेख याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिचा फोन नंबर घेतला. तिला फोनव्दारे व शाळेमध्ये पाठलाग करून,‘तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर फार प्रेम आहे’, असे बोलून तिची छेड काढली.
घडलेल्या प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. आईने शेख याला फोन करून समजावून सांगितले असता त्याने त्यांना शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.