अहमदनगर

‘तू मला फार आवडतेस’, असे म्हणत युवतीचा…

गाडीवर पाठलाग करून युवतीला रस्त्यात आडवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चंद्रकांत उजागरे (पूर्ण नाव, पत्ता माहीती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. शहरात राहणारी पीडित युवती तिच्या आजीबरोबर दुचाकीवरून जात असताना मार्केट यार्ड पासून एका दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग सुरू केला.

पीडित युवती जिल्हा सैनिक बोर्ड जवळ आली असता दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने तिची गाडी अडवून थांबवले. ‘तू मला फार आवडतेस, असे म्हणत डोळा मारून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button