अहमदनगर

कारखान्याने एफआरपीनुसार भाव न दिल्यास आंदोलन करणार

भाजप किसान मोर्चाच्या वतीने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यांना शेतकऱ्यांना उसाला २८०० रुपये भाव मिळावा, यासाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचे दर राज्यामध्ये सर्वाधिक ३१०० रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले. या वर्षी आपल्या लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १४ लाख ५१ हजार टन उसाची गाळप केले.

आपण अतापर्यंत २१०० रुपये भाव शेतकऱ्यांना अदा केला. तरी शेतकऱ्यांची ऊस दरासंदर्भांमध्ये आपणाकडून जो भाव मिळण्याची निश्चित आहे. ती २८०० रुपये इतकी आहे. व सन २०२०-२१ या हंगामचा ऊस भाव निश्चित करण्यासाठी वेळोवेळी आपणास पत्र दिले. आपणास मिटिंग आयोजित करण्यासाठी पत्रही दिले.

परंतु आपण त्याची दखल न घेता ऊस हंगाम समाप्ती झालेली असताना अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. तरी या निवेदनानंतर दोन दिवसांमध्ये आपण आमच्या समवेत बैठक आयोजित करून अंतिम भाव जाहीर करावा,

अन्यथा आठ दिवसानंतर आम्ही सर्व शेतकरी कारखाना गेट समोर उपोषण करणार आहोत. निवेदन देते वेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, भाऊराव नगरे, अण्णासाहेब गव्हाणे, दत्तूकाका काळे, थोटे पाटील, अमोल कोलते आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button