केसांमध्ये घाम आणि दुर्गंधी येते असेल ही माहिती वाचाच !

उन्हाळ्यात, त्वचा आणि शरीराबरोबरच केसांसाठी देखील विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, शरीरावर घाम येणे आणि केसांमध्येही घाम येतो . ज्यामुळे केसांमध्ये खाज सुटणे आणि गंध येण्याची समस्या सुरु होते.
केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत, आम्ही आपल्याला या समस्येचा सामना करण्याचा एक मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या केसांमध्ये घाम येणे आणि दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवणार नाही.
उन्हाळ्याच्या हंगामात आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवावेत. तसेच, आपल्या केसांमध्ये घाम येऊ नये आणि वास देखील येऊ नये यसाठी शैम्पूमध्ये एक चमचा साखर टाका आणि तो संपू लावा. याचा तुमच्या केसांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. जाणून घ्या शाम्पूमध्ये साखर मिसळून केस धुण्याचे फायदे
केसांची वाढ- शाम्पूमध्ये साखर टाकल्यास केसांची वाढ होते. यासाठी कोणताही शैम्पू घ्या आणि त्यात एक चमचा साखर टाका आणि मग तो केसांना लावा.
आरोग्यदायी केस- उन्हाळ्यात केस खूप निर्जीव आणि कोरडे होतात, यासाठी शैम्पूमध्ये साखर टाकावी हे आपले केस निरोगी आणि जाड बनवेल.
मऊ केस – शैम्पू लावल्याने आपले केस थोड्या काळासाठी मऊ राहतात, परंतु त्यानंतर थोडया वेळाने आपले केस कोरडे होतात , यासाठी शैम्पूमध्ये साखर टाकावी.
डोक्यातील कोंडा- उन्हाळ्यात केसांच्या घामामुळे डोक्यात कोंडा होण्याची समस्या असते. तुम्ही शैम्पूमध्ये साखर टाकून केस धुवा. आपल्याला त्याचा परिणाम २ आठवड्यांत दिसेल