अहमदनगरताज्या बातम्या

कामे वेळेवर होत नसतील तर आम्ही नगरसेवक पदाचे राजीनामे देतो

प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण कामासाठी आम्ही पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून दिला.

अनेक वर्षानंतर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि काम सुरू झाले. या कामांमध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन असल्यामळे ही लाईन स्थलांतरित करण्याचे ठरले.

प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र ही लाईन वेळेवर स्थलांतरित होऊ न शकल्यामुळे रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम बंद पडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामळे प्रशासनाच्या हलगर्जीपणा व उदासीनपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पाईपलाईन स्थलांतरित करायची असल्यामुळे रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे खोदलेल्या रस्त्यामध्ये तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. यामळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जर सुचविलेली कामे वेळेवर होत नसतील तर आम्ही नगरसेवक पदाचे राजीनामे देतो अशी तीव्र भावना आयुक्‍त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक अशोक बडे व भालचंद्र भाकरे यांनी व्यक्‍त केली. पावसाळयाचे दिवस जवळ येत असून रस्त्यामधील पाईपलाईन स्थलांतरित काम तातडीने मार्गी लावून गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.

नागरिक तौत्र स्वरूपाच्या भावना व्यक्‍त करत आहे. बोल्हेगाव- नागापूर परिसरातील नागरिकांना फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे, परंतु नियोजनाच्या अभावामुळे प्रभागातील प्रश्‍न मार्गी लागण्यास उशीर होत आहे.

या कामासाठी आयुक्‍त डॉ.पंकज जावळे यांनी लक्ष घालून प्रभाग क्रमांक ७ मधोल प्रश्‍न मार्गी लावावे. तसेच गणेश चोक ते केशव कॉर्नर पर्यंतच्या पाईपलाईन व रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे असे सप्रे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button