अहमदनगर

सावधान! तुम्ही बसने प्रवास करत असाल तर दागिने संभाळा; अशी होईल चोरी…

खासगी बसमधून प्रवास करणार्‍या व्यक्तींच्या बॅगमधील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम लुटणार्‍या टोळीतील एकाच्या मुसक्या नगर तालुका पोलिसांनी आवळल्या.

असलम खा अली हुसेन खा (वय 42 रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी असलम खा अली हुसेन खा हा त्याच्या साथीदारासह चारचाकी वाहनातून कामरगाव शिवारातील हॉटेलवर आला.

तेथे उभा असलेल्या बसमध्ये प्रवेश करून त्याने बॅगमधील ऐवज लंपास केला. चोरटे चारचाकी वाहनातून बस थांबा असलेल्या हॉटेलवर येतात व चोरी करून त्या वाहनातून निघून जातात. अशा चोरट्यांपासून सावधानता बाळगा,

असे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे. रोशन हरीभाऊ जवजाळ (वय 34 मुळ रा. कांडली परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती, हल्ली रा. हडपसर, पुणे) हे कुटूंबासह युगा ट्रव्हल्सच्या बसने (एमएच 12 एनबी 5505) प्रवास करत होते.

अहमदनगर-पुणे बस प्रवासादरम्यान बस कामरगाव शिवारात हॉटेल आशिर्वाद येथे थांबली. त्यावेळी चोरट्यांनी जवजाळ यांच्याकडील बॅग लंपास केली.

या बॅगमध्ये चार तोळे सोन्याची मोहनमाळ, एक तोळ्याचे झुमके, पाच हजार रूपये रोख रक्कम, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तीन वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड असा दोन लाख 30 हजार रूपयांचा ऐवज होता.

तो चोरीला गेला आहे. जवजाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button