अहमदनगर

गुगलवरील टोल फ्री मोबाईल नंबरवर संपर्क केल्यास तुमची होईल फसवणूक; कारण…

अहमदनगर- गुगलवर मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे मोबाईल नंबर आहे. या नंबरवर संपर्क केल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. नगर शहरात असा प्रकार समोर आला आहे.

 

क्रेडीट कार्डच्या बिलासंदर्भात तक्रार करण्यासाठी गुगलवरून घेतलेल्या टोल फ्रि नंबरवर संपर्क केल्याने एका सेवानिवृत्त अधिकार्‍याची 44 हजार 545 रुपयांची फसवणूक झाली आहे. 4 डिसेंबर रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी 5 डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात एका मोबाईल नंबरवरील अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बाबुराव कडु महाडीक (वय 58 रा. अर्बन बँक कॉलनी, वसंत टेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडे आर.बी.एल. बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. 2 डिसेंबर रोजी फिर्यादी यांनी क्रेडीट कार्डचे महिन्याचे बिल भरले होते. त्यानंतर त्यांना 4 डिसेंबर रोजी सकाळी एका लिंकचा मेसेज आला. फिर्यादी यांनी गुगलवरून एक टोल फ्रि नंबर प्राप्त करून त्यावर फोन केला.

 

फोन करून फोनवर बोलणार्‍या व्यक्तीला त्यांनी क्रेडीट कार्डचे पैसे भरलेले असतानाही पैसे भरण्याबाबतचा मेसेज का आला याबाबत विचारले. त्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांना विचारला. फिर्यादी यांनी ओटीपी सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यातून सात वेळा पैसे कपात झाले. त्यांची एकूण 44 हजार 545 रुपयांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button