नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार केली तरच मदत मिळणार मदत !
मात्र, पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किंवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे.

Agricultural News : शेतकऱ्याला शासकीय मदत पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाइन करायचा आहे.
मात्र, पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किंवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे.
शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीही वेगळ्याच असतात.
साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच प्रवेश करता येत नाही, त्यामुळे नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
काय चित्र आहे गावशिवारात
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून अॅपद्वारे माहिती भरून नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. याकरिता हातचे काम सोडून या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना दिवस वाया घालावा लागत आहे
तक्रार नोंदवायची कोणाकडे ?
शेतकऱ्यांना ऑनलाइनद्वारे तक्रार नोंदवण्यास आली नाही तर मंडल अधिकारी किंवा महसूलच्या 8 तलाठी यांच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. मात्र, हे काम कृषी विभागाचेच आहे. त्यामुळे महसूलचे अधिकारी हस्तक्षेप करत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
नुकसानीचा दावा न केल्यास काय होणार?
■सध्या ओढावलेल्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा नुकसानीचा दावा करू शकला नाही तर काय होणार? यावर पीक विमा कंपनीने काय पर्याय काढला आहे का? तर याचे उत्तर आहे, असा कोणताही पर्याय शेतकऱ्यांकडे नाही.
■ नुकसानीच्या दाव्याशिवाय शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन हे कळवावेच लागणार आहे.
या पद्धतीने नोंदविता येणार तक्रार
१) शेतकऱ्यांना क्रॅप इन्शुरन्स अँप यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.
२) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाइनही तक्रार करू शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
३) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदविता येणार आहे. 3 संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारिचा अर्ज दावा लागणार आहे.
४) बँकेत शेतकयांनी आपला विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
५) १८००११८४८५ (टोल फ्री], ०२१३३२०८४८५ (सशुल्क) असे तक्रार नोंदविण्यासाठीचे क्रमांक आहे