ताज्या बातम्या

सकाळी झोपेतून उठल्यानंतर उभं राहून पाणी पित असाल तर मंग हे एकदा आवश्य वाचा.

आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे हे सर्वाना माहितीच आहे. पाणी पिण्याचे जसे चांगले फायदे ठाऊक आहेत तसेच काही वाईट परिणाम सुद्धा आहेत. कारण जितके जास्त तुम्ही पाणी प्याल तितकेच तुमच्या शरीराला आजारांशी लढण्याची क्षमता मिळते.

परंतु आपणास हे माहिती आहे का? जर आपण पाणी योग्यरित्या प्यायले नाही तर आपण बर्‍याच रोगांना आमंत्रण देत आहोत म्हणूनच या लेखात आम्ही उभे राहुन पाणी का पिऊ नये ? याबद्दल जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदाच्या नियमानुसार कधीही उभे राहून पाणी पिऊ नये. यामुळे आपल्या शरीराला बरेच आजार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोण- कोणते आजार होतात.

उभे राहून पाणी पिण्याच्या सवयींमुळे होणारे आजार

मूत्रपिंडाचा आजार- आपल्या सर्वांना हे माहित आहे की मूत्रपिंडाचे कार्य आपल्या शरीरात खुप महत्वाचे आहे. पाणी शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य मूत्रपिंड करतात

आणि शुद्ध केलेले पाणी संपूर्ण शरीरात पाठवितात परंतु जर तुम्ही उभे राहून पाणी प्याल तर ते पाणी आपल्या मूत्रपिंडांद्वारे योग्य प्रकारे शुद्ध होणार नाही

आणि संपूर्ण शरीरात जाणार नाही. ज्यामुळे तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो आणि मूत्राशय आणि रक्तातील घाण शरीरात हळूहळू जमा होण्यास सुरवात होते. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतील.

पोटाचा आजार- उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे पाणी थेट अन्न नलिकातून सरळ खाली जाते. ज्यामुळे पोटाच्या अंतर्गत भागात आणि सभोवतालच्या अवयवांना पाण्याच्या या प्रवाहाने प्रचंड दाब सहन करावा लागतो. अश्याने तुमची पाचनशक्ती बिघडेल आणि हृदयसंबधित आजार होऊ शकतात.

संधिवात समस्या- जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा त्यातून उद्भवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे संधिवाताची समस्या. कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा ते पाणी गुडघामधील सांध्यातील द्रवपदार्थाचे संतुलन बिघडवते.

ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास कायम राहतो यामुळे पाय दुखणे गुडघे दुखणे चालताना पायांचा आवाज येणे यांसारखे विविध आजार तुम्हाला होण्याची दाट शक्यता असते.

वरील विविध आजारांबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही सर्वांनी भरपूर पाणी प्याल अशी आशा आहे. परंतु पाणी योग्यरित्या पिणे फार महत्वाचे आहे जेणेकरुन तुम्ही सर्व आजारांना रोखू शकाल आणि निरोगीमय आयुष्य जगाल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button