अहमदनगरताज्या बातम्या

तु पुन्हा आमचे नादी लागला तर तुझे हातपाय तोडू

तु आणि तुझ्या मित्रांनी आमच्या बरोबर यात्रेत वाद का घातला, असे म्हणून सलमान पठाण याला लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण करून जखमी केले, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना दिनांक १० एप्रिल रोजी राहुरी शहरात घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की सलमान सलीम पठाण (वय २४ वर्षे, रा. राजवाडा, राहुरी बु. ता. राहुरी) हा तरूण दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राहुरी शहरातील भागीरथीबाई शाळा रोड परिसरातील फुले चहाच्या टपरीसमोर चहा पित होता.

तेथे आरोपी आले आणि सलमान पठाण याला म्हणाले की, काल तु व तुझे मित्र हर्षद उत्तम साळवे, विशाल उत्तम साळवे अशांनी आमच्या सोबत राहुरी येथील खंडोबा देवाचे यात्रेमध्ये वाद का केला होता.

तुम्हाला खुप माज आला आहे, असे म्हणून शिवीगाळ केली व पठाण याला तिघा जणांनी लाथाबुक्क्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केले.

तु पुन्हा आमचे नादी लागला तर तुझे हातपाय तोडू, अशी धमकी दिली. घटनेनंतर सलमान सलीम पठाण याने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पठाण याच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पिसाळ, प्रशांत तमनर (दोघे रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी), औंकार साळवे (रा. मुलनमाथा, ता. राहुरी) या तिघांवर गुन्हा रजि. नं. ३६३/२०२३ नुसार भा. दं.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button