अहमदनगर

तुमची दुचाकी चोरीला गेली असेल तर ही बातमी वाचा; चोरीच्या 20 दुचाकी पकडल्या

अहमदनगर- नगर जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या एकाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे.

 

श्रीरामपूर शहरातील एकाच आरोपीस मोठ्या शिताफीने जेरबंद करुन पोलिसांनी 9 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या आरोपीने सदरच्या दुचाकी श्रीरामपूर, संगमनेर, लोणी, आळेफाटा पुणे, बिबवेवाडी (जि.पुणे), सायंगाव (जि. नाशिक), तळेगाव, रहिमपूर, बेलपिंपळगाव, कोपरगाव या ठिकाणाहून चोरी केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

 

.महिन्यापासून श्रीरामपूर शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांचा तपास करत असताना काल इब्राहीम गणी शाह (रा. बीफ मार्केट, वॉर्ड नं. 2) हा जिल्हा व परिसरात दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवत सापळा रचत त्यास जेरबंद केले.

 

इब्राहीम गणी शाह याने श्रीरामपूर शहरातून 6 दुचाकी चोरल्या होत्या यात बजाज प्लाटीना (क्र.एमएच 17-एक्यु-3968), टीव्हीएस स्टार (एमएच 17-डब्ल्यु-0252), होंडा शाईन (एमएच 17-बीजे-3381), हिरो आय स्मार्ट (एमएच 17-बीजी -2206), हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच 17-एपी -2673), बजाज बॉक्सर (एमएच 17-एन-8100),

 

संगमनेर शहरातून हिरो एचएफ डिलक्स (एमएच 17-बीयू 8372), लोणी येथून होंडा शाईन (एमएच 17-सीई-4194), बजाज (एमएच 17-एयु-5673), आळेफाटा (पुणे) येथून हिरो स्प्लेंडर (एमएच 14-बीएन-0910), बिबवेवाडी (पुणे) येथून बजाज सीटी-100 (एमएच12 डीसी-2242), सायंगाव (जि.नाशिक) येथून हिरो स्प्लेंडर (एमएच 15-एएन-873), तळेगाव (ता. संगमनेर) येवून हिरो स्प्लेंडर (एमएच 17 एडब्ल्यु-3610), रहिमपूर (ता. संगमनेर) येथून बजाज डिस्कव्हर (एमएच05-बीएन 6080),

 

बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथून बजाज प्लाटीना (एमएच 12 डीव्ही 1816), टीव्हीएस (एमएच 17 एएल 6160), कोपरगाव येथून हिरो एचएफ डिलक्स-(एमएच 17 बीटी 2530), पल्सर 125 (एमएच 17 सीटी 0904, विनानंबर हिरो सुपर स्पलेेंडर, कावासाकी बजाज (एमएच 16 आर 716) या गाड्या जप्त केल्या आहेत.

 

काही दुचाकी भंगार म्हणून विक्री झाल्याचे समोर येत आहे. लवकरच अधिक तपास करुन भंगार व्यापार्‍यांनाही ताब्यात घेणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button