IMD Rain Alert : महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पुढील ५ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस! हवामान खात्याकडून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही राज्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

IMD Rain Alert : देशभरात मान्सूनच्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तसेच काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच आता महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांमध्ये नवीन हवामान प्रणाली सक्रिय होणार आहे. त्याचा परिणाम पूर्ण देशावर होताना दिसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याकडून देशातील २० राज्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस बिहार, अरुणाचल प्रदेश आणि गोव्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराममध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गोव्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील सिक्कीम आणि आसामसह दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक आणि किनारी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिल्लीमध्ये 4 आणि 5 जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
IMD कडून आसाम, मेघालय, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे 3 जुलै रोजी म्हणजेच आज मुसळधार पडणार असल्याचा अंदाज व्यक्त एकला आहे.
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी देखील मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आतापर्यंत किती पाऊस
यंदा मान्सून दाखल होण्यास विलंब झाला असला तरी काही राज्यांमध्ये त्याची जोरदार बॅटिंग सुरु आहे तर काही राज्यांमध्ये अजूनही काही भाग कोरडाच आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या इतर काही राज्यांमध्येही जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडला आहे. बिहारमध्ये सामान्यपेक्षा 69 टक्के कमी आणि केरळमध्ये 60 टक्के पाऊस पडला.