ताज्या बातम्या

Important Deadline July : जुलै संपण्यापूर्वी ‘ही’ महत्वाची कामे लवकर उरका, अन्यथा नंतर होईल लाखो रुपयांचे नुकसान; पहा यादी…

जुलै महिना सुरू आहे, या काळात अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार आहे. जर तुम्ही पैशाचे व्यवहार करत असाल तर तुम्ही या महिन्यात हे काम मिटवावे.

Important Deadline July : प्रत्येक महिना सुरु झाला किंवा संपत आल्यानंतर पुढील महिण्याबाबत नियम बनवले जातात. अशा वेळी या नियमांचे पालन करून तुम्ही वेळेच्या अधिक तुमची कामे पूर्ण केली तर तुम्ही आर्थिक नुकसानापासून वाचले जाता.

दरम्यान, सध्या जुलै महिना सुरू आहे. या महिन्यात तुम्ही आर्थिक व्यवहारासंबंधी अनेक महत्वाची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. अन्यथा हा महिना संपल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

ही अशी कामे आहेत जी तुम्ही वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, यानंतर मोठ्या समस्या निर्माण होतील. जुलै महिना चालू आहे. अनेक कामांची मुदत या महिन्यात संपणार आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

विशेषत: जे लोक पैशाशी संबंधित व्यवहार करतात, त्यांनी ही महत्त्वाची कामे कोणती आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. जुलै 2023 मध्ये कोणते काम पूर्ण करणे आवश्यक आहे ते येथे तुम्ही जाणून घ्या.

आयकर रिटर्न फाइल करा

आर्थिक वर्ष 2023 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. दंडासह उशीरा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 आहे. या वेळेपर्यंत तुम्ही आयटीआर फाइल न केल्यास तुम्ही रिटर्न फाइल करू शकणार नाही.

विलंबित ITR

तुम्ही 31 जुलैनंतर आणि 31 डिसेंबरपूर्वी आयटीआर फाइल केल्यास त्याला विलंबित आयटीआर म्हणतात. उशीरा आयटीआर दाखल केल्यास दंड भरावा लागतो. याशिवाय सध्याच्या आयकर नियमांनुसार आयटीआरची पडताळणी करावी लागेल. ही आयटीआर पडताळणी तुम्हाला 30 दिवसांच्या आत करावी लागणार आहे.

किती दंड होईल?

जर तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर तुम्ही हे काम 31 डिसेंबरपर्यंत करू शकता. यासाठी तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये दंड भरावा लागेल. अशा प्रकारे तुमचा आर्थिक तोटा होऊ शकतो.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button