Women’s Health : महिलांसाठी महत्वाचे ! मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळी घेताय मग हे वाचाच…
गोळीची सवय लागणे घातकच असते. छोट्या छोट्या कारणांसाठी या गोळ्या घेतल्या जातात. खरे तर त्याची गरज नसते, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Women’s Health : पाळी वेळेवर येणे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते; परंतु अनेकवेळा पाळी लांबविण्यासाठी गोळी घेतली जाते. या गोळीचे दुष्परिणामही असतात.
गोळीची सवय लागणे घातकच असते. छोट्या छोट्या कारणांसाठी या गोळ्या घेतल्या जातात. खरे तर त्याची गरज नसते, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
पाळी वेळेवर येणे आरोग्यासाठी चांगले
वयात आलेल्या मुलींना व महिलांना मासिक पाळी वेळेवर येणे आरोग्यासाठी चांगले असते. तारखा चार दिवस पुढे मागे होऊ शकतात. पाळी वेळेवर आली की सायकल रेग्युलर राहते.
मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेण्याची सवय लागली तर भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतात. गोळी अचानक बंद केली तर मासिक पाळीत रक्तस्राव जास्त होऊ शकतो. ज्या महिलांना उच्च रक्त्तदाब, मधुमेह, स्थूलपणा आहे, त्यांनी अशा प्रकारच्या गोळ्या घेणे टाळायला हवे
गोळ्या घेणे धोकादायक
मासिक पाळी लांबण्यासाठी प्रत्येक महिन्याला गोळ्या घेणे टाळायला हवे. या सोबतच जास्त कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवनदेखील महिलांसाठी घातक ठरु शकते.
गोळ्या जास्त कालावधीसाठी घेतल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते. सतत गोळी घेणे धोकादायक ठरू शकते
गोळ्यांचे दुष्परिणाम काय ?
गोळी एक किवा दोन वेळेस घेतली तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. सातत्याने घेतले तर रक्तस्राव होणे, मासिक पाळी अनियमित होते.
पाळी जास्त लांबविली आणि गोळ्या अचानक थांबविल्या तर जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो, त्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो, म्हणजेच शरीरातील रक्त कमी होऊ शकते. तसेच मिनोरेझियचा त्रास होऊ शकतो.